लाचेची मागणी भोवली ; भुसावळ डीआरएम कार्यालयातील दोघे अधिकारी जाळ्यात

ऑगस्ट 16, 2021 3:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ । मंजूर निविदांची वर्क ऑर्डर देण्यासाठी २ लाख ४० हजार रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारताना भुसावळ डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंत्यासह एकाला नागपूर सीबीआयच्या पथकाने आज सोमवारी दुपारी रंगेहात अटक केली. एम.एल.गुप्ता व ओ.एस.संजय रडे असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

crime

नागपूर सीबीआयचे उपअधीक्षक एस.आर.चौगुले व उपअधीक्षक दिनेश तळपे या अधिकार्‍यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला. मंजूर निविदांची वर्क ऑर्डर देण्यासाठी गुप्ता यांनी दोन लाख तर रडे यांनी 40 हजारांची लाच मागितल्याने मलकापूर येथील तक्रारदारो नागपूर सीबीआयडे तक्रार केली होती.

लाचेची पडताळणी केल्यानंतर सोमवारी सापळा यशस्वी करण्या आला. दरम्यान, दोघा अधिकार्‍यांच्या घराची सीबीआयकडून झडती ससुरू असून त्यात काय सापडले याबाबत माहिती कळू शकली नाही.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now