जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ ।महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागात मोठी पदभरती जाहीर करण्यात आलीय. विशेष या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. लक्ष्यात असू द्या या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आलीय. या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19900/- ते 63200/- रुपये पगार मिळेल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.

पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | विभाग/प्रदेश | पद संख्या |
| 1 | भूकरमापक | पुणे प्रदेश | 83 |
| कोकण प्रदेश, मुंबई | 259 | ||
| नाशिक प्रदेश | 124 | ||
| छ. संभाजीनगर | 210 | ||
| अमरावती प्रदेश | 117 | ||
| नागपूर प्रदेश | 110 | ||
| Total | 903 |
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : अमागास प्रवर्ग : ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
पगार : रु 19900/- ते 63200/-
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | इथे क्लीक करा |












