भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये १० वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! ७९,००० पगार मिळणार

जुलै 18, 2026 3:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने हवालदार (सुरक्षा) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

BEL

पात्रता काय?

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव असणेही आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेतील शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती काळजीपूर्वक तपासावी. अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे

हवालदार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ४३ वर्षे असावे. वयाची गणना १ जुलै २०२६ या तारखेनुसार केली जाणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.
ओबीसी: ३ वर्षांची सवलत
एससी/एसटी: ५ वर्षांची सवलत

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹२०,५०० ते ₹७९,००० इतका पगार मिळणार आहे. याशिवाय कंपनीच्या नियमानुसार महागाई भत्ता, वैद्यकीय सुविधा आणि इतर विविध भत्ते व सेवा लाभही दिले जाणार आहेत.

अर्ज कसा कराल?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी BEL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी. त्यानंतर अर्जामध्ये आवश्यक माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा एकदा तपासावी आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.

सरकारी क्षेत्रात चांगल्या पगाराची आणि सुरक्षित नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now