मद्यप्रेमींना धक्का : आता बिअरच्या किमती वाढणार, त्यामागील ‘हे’ आहे कारण?

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । वाढत्या महागाईचा ठसका (inflation) आता बिअर पिण्याऱ्यांनाही बसणार आहे. कारण लवकरच बिअरच्या किमती वाढणार आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने आता बिअरच्या किमतीही वाढवल्या जाऊ शकतात, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. यासोबतच उन्हाळी हंगामात बिअरची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि अशा परिस्थितीत कंपन्या किंमत वाढवण्याचा विचार करत आहेत.

कच्च्या मालाच्या किमतीत वाढ
मनी कंट्रोलच्या बातमीनुसार, कंपन्यांचे म्हणणे आहे की बीयर बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बार्लीची किंमत तीन महिन्यांत दुप्पट झाली आहे. यासोबतच बॉटलिंग कंपन्यांनीही दरात ३० टक्क्यांनी वाढ केली आहे. एवढेच नाही तर लेबलपासून ते बॉक्सपर्यंतच्या किमतीही वाढल्या आहेत. अशा स्थितीत बिअरच्या किमती वाढवण्यासाठी कंपन्यांवर दबाव आहे.

या शहरांमध्ये वाढणार किमती
दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रासह अनेक शहरांमध्ये बिअरच्या किमती वाढवणार आहे. ग्राहकांवर जास्त बोजा पडू नये म्हणून दरात वाढ योग्य पद्धतीने केली जाईल, असे युनायटेड ब्रुअरीजचे सीईओ ऋषी परदल म्हणाले. यूबी कंपनी हेनेकेन आणि किंगफिशर ब्रँड अंतर्गत बिअर बनवते. यापूर्वी कंपनीने बीरा 91 ब्रँडच्या किमती वाढवल्या आहेत.

भारतात बिअरच्या किमतींवर राज्य सरकारचं नियंत्रण असतं. राज्य सरकारच्या महसूल विभागाला मद्य विक्रीच्या करातून मोठ्या प्रमाणावर पैसा मिळतो. B9 बेव्हरेजेसचे संस्थापक आणि सीईओ अंकुर जैन यांनी म्हटलंय की, बिअर बनवण्यासाठी ग्लास, गहू, अॅल्यूमिनियम यांसारखे जे महत्वाचे घटक आहेत त्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याबाबत आम्ही खुलासा करण्याचा प्रयत्न करत आहोत.