बातम्या

जळगाव जिल्ह्यात : आज सलग दुसऱ्यादिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असून, नव्या रुग्णांची संख्या आता पन्नासच्या टप्प्यात आली आहे. सोबतच जिल्ह्यात कोरोनाच्या दुस-या लाटेत चार महिन्यानंतर आज सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू झालेला नाही. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. आज सोमवारी जिल्ह्यात कोरोनाचे ४८ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर १०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

corona update

जळगाव शहर-०१, जळगाव ग्रामीण-०५, भुसावळ-००, अमळनेर-००, चोपडा-०७, पाचोरा-०४, भडगाव-००, धरणगाव-०३, यावल-००, एरंडोल-०३, जामनेर-००, रावेर-०१, पारोळा-०४, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर-०२, बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण ४८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Related Articles

Back to top button