⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | आडगावात गटारीच्या‎ पाण्यावरून एकाला मारहाण‎; ५ जणांविरोधात गुन्हा

आडगावात गटारीच्या‎ पाण्यावरून एकाला मारहाण‎; ५ जणांविरोधात गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । यावल‎ तालुक्यातील आडगाव येथे गटारीच्या‎ सांडपाण्यावरून एकाला पाच‎ जणांनी मारहाण केल्याची घटना‎ गुरुवारी सायंकाळी घडली. या‎ प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा‎ दाखल झाला आहे.

आडगाव येथील रवींद्र साहेबराव‎ पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार‎ गुरुवारी सायंकाळी साडेसहा‎ वाजेच्या सुमारास त्याच्या घराजवळ‎ प्रवीण सुरेश चौधरी हा आला. त्याने‎ गटारीचे सांडपाणी पास झाले आहे‎ का? पाहुन घे असे सांगितले.‎ गटारीच्या सांडपाण्याच्या‎ कारणावरून प्रवीण चौधरी याने‎ शिवीगाळ करत गच्ची धरुन खाली‎ आदळले. प्रवीण चौधरीसह रवींद्र‎ सुरेश चौधरी, सुरेश बाबुराव‎ चौधरी, वैजंताबाई सुरेश चौधरी,‎ वंदनाबाई रवींद्र चौधरी या पाच‎ जणांनी मारहाण केली.‎

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह