बाप-लेकाला बेदम मारहाण; संशयिताला पोलीस कोठडी

एप्रिल 6, 2022 9:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । पहूर येथील बसस्थानक परिसरात बाप व लेकाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण झाली. या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

court order jpg webp

येथील एस. कुमार इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मालक संतोष संतोष चिंचोले व त्यांच्या मुलाला मारहाण झाली आहे. संशयितास जामनेर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. सोमवारी सकाळी दीपक संतोष चिंचोले दुकानात होते. त्यावेळी संशयित रोहित दीपक थोरात उर्फ चिक्या तेथे आला. त्याने दीपकला लोखंडी सहित्याने बेदम मारहाण केली. वाद सोडवण्यासाठी संतोष चिंचोले गेले असता त्यांनाही मारहाण केली. दीपकवर पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now