---Advertisement---
बातम्या जळगाव जिल्हा राजकारण

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी बत्तीगुल होते तेव्हा… भुसावळातल्या सभेतील प्रकार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२४ । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. भुसावळ येथे फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. मात्र या प्रचारसभेत आज अजब प्रकार बघायला मिळाला आहे. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु असतानाच अचानक बत्तीगुल झाली. अचानक लाईट गेल्यामुळे मंचावर पूर्णत: अंधार पसरला. पण देवेंद्र फडणवीस यांनी आपलं भाषण सुरुचं ठेवलं. ही संपूण घटना कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाली आहे.

fadanvis jpg webp

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात याबाबत उल्लेख केला. “तुमचे लाईट सुरु झाले. अरे आपला करंटच असा आहे की या लाईटची आवश्यकता नाहीय. डब्ब्यामध्ये आपण बसलो तर हा डबा मोदींच्या डब्याला लागणार आहे. काय सुंदर दृश्य आहे बघा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

---Advertisement---

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची नाराजी दूर केली होती. यानंतर आज रक्षा खडसेंच्या प्रचारात मुक्ताईनगरचे आमदार फडणवीस यांच्या सभेला उपस्थित झाल्याने आमदार सक्रिय झाल्याचं स्पष्ट झालं.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---