जळगाव जिल्हा

जळगाव मार्गे धावणार उधना ते पंढरपूर स्पेशल ट्रेन

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२५ । आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या खान्देशातील हजारो वारकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने उधना ते पंढरपूर स्पेशल ट्रेन धावणार आहे. विशेष या गाडीला जळगाव स्थानकावर थांबा असणार आहे.

train pandharpur

खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून या विशेष रेल्वेची मागणी केली होती. रेल्वे क्रमांक ०९०७९/०९०८० ही ४ जुलै, रेल्वे क्र. ०९०८१/०९०८२ ही ५ जुलै रोजी उधना येथून सुटेल. तर पंढरपूरहून परतीचा प्रवास ५ व ६ जुलै रोजी होईल.

या स्थानकावर असेल थांबा?
बारडोली, व्यारा, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर स्टेशन दोन्ही दिशांनी.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button