⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | डॉ केतकी पाटील यांच्या सौजन्याद्वारे मेहरूण तलाव येथे निर्माल्य संकलन

डॉ केतकी पाटील यांच्या सौजन्याद्वारे मेहरूण तलाव येथे निर्माल्य संकलन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२४ । अनंत चतुर्दशीदिनी जड अंतकरणाने भाविकांनी आपल्या लाडक्या गणेश बाप्पाचे विसर्जन शहरातील मेहरूण तलाव येथे केले. या प्रसंगी गोदावरी फाऊंडेशन संचालिका तथा भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांच्या सौजन्याद्वारे निर्माल्य संकलन रथ तयार करण्यात आला होता. या समाजपयोगी उपक्रमास गणेश भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या वर्षी अकरा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या यात घरगुती, मंडळाचे गणपतीचे विसर्जन मेहरूण तलाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आले. गणेश मूर्तीसोबत फुल, हार, दुर्वा, पान या सारखे निर्माल्य देखील विसर्जनासाठी भाविक घेऊन येत होते. मात्र निर्माल्यामुळे नदी, तलावातील पाणी खराब होते तसेच विर्सजनचे साहित्य काठावर राहून नदी, तलावाचे चित्र खराब दिसते. याकरिता डॉ केतकी ताई पाटील यांनी आपल्या गोदावरी फाऊंडेशन च्या सहकार्याने निर्माल्य संकलन रथ तयार करून घेतला. मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपासून ते सायंकाळपर्यंत मेहरूण तलाव येथे १२ जणांची टीम द्वारे निर्माल्य संकलन करण्यात आले. या रथाचे गणेश भक्तांकडून स्वागत करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया च्या नामात रममाण झालेल्या भाविकांनी डॉ केतकी ताई पाटील यांच्या सौजन्यातून निर्माल्य संकलन रथात देऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला.

श्रावण महिन्यात कावड यात्रेच्या निमित्ताने कचरा संकलन वाहन फिरविण्यात आले होते. त्याचा उपयोग पाहता गणेश विसर्जन दिनी निर्माल्य संकलन रथ तयार करण्यात आला होता. त्यास भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल आनंद वाटला. आगामी काळात देखील विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने परिसर स्वच्छ ठेण्यासाठी या प्रकारचे समाजपयोगी उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा मानस आहे.

  • डॉ केतकी ताई पाटील,
    प्रदेश उपाध्यक्षा, भाजप महिला मोर्चा
author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.