⁠ 
रविवार, मे 5, 2024

सर्वसामान्यांना मोठा झटका : आजपासून महावितरणच्या वीज दरात वाढ, अशी वाढ हाेईल तुमच्या बिलात

जळगाव लाईव्ह न्युज : १ एप्रिल २०२४ : राज्यातील महावितरण कंपनीने आपल्या वीज ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. आजपासून महावितरणच्या वीज दरात वाढ करण्यात आली आहे. वीजबिलात सरासरी 7.50 टक्क्यांची वाढ होणार आहे. आज 1 एप्रिलपासूनच हे नवे वीज दर लागू करण्यात आले आहेत.

एकीकडे उन्हाळा सुरू झाला आहे. वाढत्या तापमानामुळे लोक होरपळून निघत आहे. यातच काही गोष्टीत दिलासा मिळत असताना महावितरणने ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक दिला आहे.

आजपासून वीजबिलात सरासरी 7.50 टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही 10 टक्के दरवाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणकडून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून वीजबिलात किमान पन्नास रुपयांची वाढ होणार आहे.

अशी वाढ हाेईल तुमच्या बिलात
वीजवापर (युनिट्स).. जुने दर
नवे दर० ते १००… ५.५८ रुपये
५.८८ रुपये,………१०१ ते ३००
१०.८१ रुपये ….. ११.४६ रुपये
३०१ ते ५०० …. १४.७८ रुपये
१५.७२ रुपये….५०१ ते १०००
१६.७४ रुपये … १७.८१ रुपये