जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महिलांसाठी सरकारी बँकेत नोकरीची संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने लिपिक म्हणजेच ग्राहक सेवा सहयोगी पदाच्या १२ रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या https://bankofmaharashtra.in/ या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै आहे. या भरतीसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात. Bank of Maharashtra Bharti 2024
शैक्षणिक पात्रता
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये लिपिक पदाच्या भरतीसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात. उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी पूर्ण केलेली असावी.
किती पगार मिळेल?
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये लिपिक पदासाठी 24050 ते 64440 रुपये पगार असेल. यामध्ये मूळ वेतन 24050 रुपये आहे. पगारासह, निवडलेल्या उमेदवारांना डीए (महागाई भत्ता), घरभाडे भत्ता, सीसीए आणि वैद्यकीय यासह इतर भत्ते देखील मिळतील.
अर्ज फी
सामान्य, EWS आणि OBC – रु 590
एससी/एसटी प्रवर्गासाठी – रु. 118
निवड कशी होईल?
उमेदवारांची निवड प्राविण्य चाचणी, क्षेत्रीय चाचणीच्या आधारे केली जाईल. ही परीक्षा 100 गुणांसाठी असेल. ज्यामध्ये प्रत्येकासाठी 50 गुण विहित केलेले आहेत.
अर्ज कसा करायचा
उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या https://bankofmaharashtra.in/ या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यानंतर त्याची प्रिंट काढून या पत्त्यावर पाठवा-
पत्ता- महाव्यवस्थापक, एचआरएम, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआर विभाग, लोकमंगल, 1501, शिवाजी नगर, पुणे, 401100
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा