BOB Bharti : बँक ऑफ बडोदामध्ये ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

जून 24, 2022 12:03 PM

तुम्ही जर बँकेत नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (BOB Financial Solution Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्यालिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2022 असणार आहे.

bank of baroda jpg webp

एकूण जागा 05

पदाचे नाव :
प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी –

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 45 वर्षांच्या खाली असणं आवश्यक आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 08 जुलै 2022

नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now