सरकारी बँकेत ग्रॅज्युएट्स तरुणांना नोकरीची उत्तम संधी; तब्बल 2500 जागांसाठी भरती

जुलै 5, 2025 7:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये मोठी पदभरती निघाली आहे. या भरतीची अधिसूचना बँकेनं जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकल बँक ऑफिसर (LBO) पदांसाठी ही भरती होणार आहे. Bank of Baroda Bharti 2025

BOB Bharti

जर तुम्हालाही बँक ऑफ बडोदामध्ये लोकल बँक ऑफिसर म्हणून काम करायचे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. विशेष पदवी पास उमेदवार या पदांसाठी भरती करू शकतो. या भरतीद्वारे तब्बल 2500 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. त्यापैकी 485 पदे ही महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे मराठी तरुण-तरुणींसाठी नोकरीची ही एक उत्तम संधी चालून आली आहे. Bank of Baroda Recruitment 2025

या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्हालाही या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. 24 जुलैपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

पदाचे नाव : लोकल बँक ऑफिसर (LBO)
शैक्षणिक पात्रता : या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच, उमेदवारांना व्यावसायिक बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत एक वर्षाचा कामाचा अनुभव आणि इतर विहित पात्रता देखील असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. उमेदवारांना वयोमर्यादेतही सूट देण्यात येईल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना वयोमर्यादेत पाच वर्षे आणि ओबीसी उमेदवारांना वयोमर्यादेत तीन वर्षे सूट देण्यात येईल.
परीक्षा फी : General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹175/-]

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज  Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now