बँक ऑफ बडोदामध्ये भरघोस पगाराच्या नोकरीची संधी ! 330 जागांसाठी भरती

जुलै 31, 2025 12:05 PM

तुम्हीही सरकारी बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदासाठी भरती जाहीर करण्यात आलीय. या भरतीद्वारे एकूण ३३० रिक्त जागा भरल्या जाणार आहे. जर तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तरीख १९ ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. Bank of Baroda Bharti 2025

bank of baroda

पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर, डेप्यूटी मॅनेजर, सायबर सिक्युरिटी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 

भरतीसाठी पात्रता काय?

या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. बीई, बीटेक, एमई, एमटेक किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये एमएससी पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी विविध पदांसाठी पात्रता वेगवेगळी असते. त्यामुळे इच्छुकांनी आधी अधिसूचना वाचा त्यानंतरच अर्ज करावेत.

वयाची अट काय?

या भरतीसाठी २२ ते ३१ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच पदानुसार ३१ ते ४८ वयोगटातीलदेखील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

किती परीक्षा फी भरावी लागेल?

सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरायचे आहे.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज  Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now