सरकारी बँकेत १०वी पाससाठी नोकरीची मोठी संधी ; ५०० जागांसाठी भरती, ३७००० रुपये पगार मिळणार

मे 9, 2025 11:16 AM

सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ऑफिस असिस्टंट पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण ५०० जागा रिक्त भरल्या जातील.

job jpg webp

विशेष या भरतीसाठी १०वी पास तरुणांसाठी उत्तम संधी आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. नोंदणी प्रक्रिया ३ मे रोजी सुरू झाली असून २३ मे २०२५ रोजी संपेल. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

पात्रता जाणून घ्या?
बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून १०वी पास असणे गरजेचे आहे. तसेच ते उमेदवार ज्या ठिकाणी राहतात त्या प्रदेशाची भाषा त्यांना लिहता आणि बोलता यायला हवी.

वयाची अट :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २६ वर्षे असावी.१ मे १९९९ ते १ मे २००७ या कालावधीत जन्म झालेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज शुल्क :
बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहेत. या नोकरीबाबत अधिसूचना बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३७००० रुपये पगार मिळणार आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment