---Advertisement---
वाणिज्य

आज १ एप्रिलपासून बँकांच्या अनेक नियम बदलले; आताच जाणून घ्या अन्यथा बसेल फटका..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२५ । प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक बदल होतात. त्याचप्रमाणे नवीन आर्थिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून बँकेचे अनेक नियम बदलले आहे. या नियमांमुळे महिन्याच्या बजेटवर परिणाम होणार आहे. एटीएमपासून ते यूपीआयपर्यंत अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत.

new rules

बचत खात्यात किमान रक्कम ठेवावी लागणार
आता तुम्हाला बचत खात्यात किमान रक्कम बॅलेंस ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. प्रत्येक बँकेची लिमिट ही वेगवगेळी असते. त्यामुळे तुम्हाला बचत खात्यात किमान रक्कम ठेवावी लागणार आहे नाहीतर दंड भरावा लागेल.

---Advertisement---

एफडी आणि बचत खात्यावरील व्याजदरात बदल
आज म्हणजेच १ एप्रिलपासून एफडी आणि बचत खात्यावरील व्याजदरात बदल होऊ शकतो. स्टेट बँक, आयडीबीआय, एचडीएफसी बँक त्यांच्या व्याजदरात बदल करु शकतात.कदाचित हे व्याजदर वाढू शकतात किंवा कमीदेखील होऊ शकतात.

UPI नवीन नियम
आता काही यूपीआय अकाउंट्स बंद होणार आहे. ज्या नागरिकांना अनेक दिवसांपासून यूपीआय अकाउंट वापरले नाही त्यांचे अकाउंट्स बंद केले जाणार आहेत. तुमचा फोन नंबर लिंक असेल पण तुम्ही यूपीआय वापरत नसाल तर तुमचे सर्व रेकॉर्ड डिलिट केले जातील.

क्रेडिट कार्डचे नियम
क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. क्रेडिट कार्डवरील अनेक फायदे आता संपणार आहेत. तुम्हाला याआधी अनेक रिवॉर्ड, कॅशबॅक सुविधा मिळत होत्या. आता या सुविधा मिळणार नाहीत.

पॉझिटिव्ह पे सिस्टीम
आता तुम्हाला ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम चेकद्वारे काढायची असेल तर त्याची माहिती आधीच बँकेला द्यावी लागणार आहे. बँकांनी त्यांच्या व्यव्हारांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

डिजिटल बँकिंग फीचर
आता डिजिटल बँकिंमध्ये एआय असिस्टंटचा वापर केला जाणार आहे. यामुळे डिजिटल व्यव्हार अधिक सोपे आणि सुलभ होणार आहे. यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे.

ATM मधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार शुल्क
रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहे. आता तुम्ही फक्त काही लिमिटपर्यंतच एटीएममधून कोणत्याही चार्जशिवाय पैसे काढू शकतात. यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. तुम्हाला प्रत्येक व्यव्हारासाठी २० ते २५ रुपये द्यावे लागणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment