---Advertisement---
जळगाव जिल्हा

वाढत्या तापमानाचा केळीला फटका, त्यात व्यापाऱ्यांकडून सुरूय लूट.. शेतकरी संकटात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२४ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात तापमानाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. या वाढत्या तापमानाचा फटका केळी पिकांना देखील बसत आहे. वाढत्या तापमानात केळी वाचविण्यासाठी बळीराजाची तारेवरची कसरत सुरू आहे. त्यातच केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीच्या बोर्ड भावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

banana tree

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ अंशापर्यंत गेला आहे. दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होत असून यापासून उभ्या केळीचा बचाव करण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे. अनेक शेतकरी आपल्या शेतातील जुन्या विहिरींना उभ्या आडव्या बोर करीत असून विहिरींचे खोदकाम करताना दिसत आहेत केळीला पूर्णवेळ पाणी देणे गरजेचे आहे, मात्र विहिरींचेही पाणी आटल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. पाणी कमी आणि तापमान प्रचंड अशी स्थिती केळीला मारक ठरत आहे.

---Advertisement---

बोर्ड भावापेक्षा मिळतो कमी भाव
काही ठिकाणी केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीच्या बोर्ड भावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेक व्यापारी मनमानी भावाने केळी घेतात. यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही. संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे व शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---