जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२३ । रावेर तालुक्यात ३१ मे २०२२ रोजी मोठ्या प्रमाणात वादळी पावसामुळे नुकसान झाले होते.यामध्ये आहीरवाडी कर्जोद, पाडला, चोरवड, अजनाड, चिनावल, लोहारा, विवरे, वडगाव, कुंभारखेडा, सावखेडा, गौरखेडा, खानापुर, अजनाड येथील सुमारे ६१२ शेतक-यांचे तब्बल २७४.७९ हेक्टर क्षेत्र बाधित झाल होते.
यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदील झाला होता.वादळी पासवामुळे २०२२ मध्ये झालेल्या नुकसान भरपाईला शासनाने मंजूरी दिली आहे. याबाबत भाजपा तर्फे आर्थिक पदरमोड करून मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर आणि संदीप सावळे यांनी वारंवार पत्रव्यवहार केला होता.
त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेऊन रावेर तालुक्यातील शेतकर्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.यामुळे शेतकर्यांमधुन समाधान व्यक्त होत आहे.