Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । रावेर तालुक्यातील बलवाडी येथील पुरी गोलवाडा रस्त्यावर महसूल विभागाच्या भरारी पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील बलवाडी येथील पुरी गोलवाडा रस्त्यावरील स्मशानभूमी जवळ २२ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास तलाठी निलेश पद्माकर पाटील, बलवाडी यांच्या पथकाने वाळूने भरलेले ट्रॅक्टर थांबवून चौकशी केली. येथील रहिवाशी विलास सतराज तायडे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये चार हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू भरलेली होती. ट्रॅक्टर पुढील कारवाई साठी तहसील कार्यालय रावेर येथे घेवून जाण्यास सांगितलेअसता त्यांनी ट्रॅक्टर पुढे घेवून जाण्याचा बहाणा करून शासकीय नोकराचे निर्देश न पाळता गर्दीचा फायदा घेत विलास तायडे याने ट्रॅक्टर पळवून नेले.
या प्रकरणी तलाठी निलेश पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून निंभोरा पोलिस स्टे.ला गुरनं.१७३/२०२२ भादंवि कलम ३७९,१८६ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री.गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हेकाॅ गणेश सुर्यवंशी,पोलिस नाईक ईश्वर चव्हाण हे करीत आहे. तपासात आरोपी विलास शतराज तायडे रा. बलवाडी यास अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आले आहे.