⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

महिलांची मासिक पाळी “शाप की वरदान” विषयावर जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न

जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । रावेर तालुक्यातील खिर्डी येथे महिला दिनानिमित्त, नॅचरल हेल्थ अँड एज्युकेशन फाउंडेशन ट्रस्ट आणि स्मार्ट चॉईस यांच्या संयुक्त विद्यमाने शांताबाई प्रल्हाद राणे विद्यालय खिर्डी येथे महिलांची मासिक पाळी “शाप की वरदान” विषयाअंतर्गत विध्यर्थिनींसाठी आरोग्यविषयक जनजागृतीचा उपक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमात रूढी, परंपरा याच्या नावाखाली चालत आलेले मासिक पाळी बद्दलचे समज-गैरसमज, अंधश्रद्धा दूर करून मासिक पाळीच्या दिवसात घ्यावयाची काळजी तसेच बाजारात उपलब्ध प्लास्टिक सॅनिटरी नॅपकिनमुळे महिलांना होणाऱ्या विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी जैविक सॅनिटरी नॅपकिन ही काळाची गरज आहे याविषयी माहिती देण्यात आली.

संस्थेच्या वतीने दीपक खाडे (कौंसलर) यांनी मार्गदर्शन केले. तसेच किशोरवयीन मुलींच्या शंकांचे निरसन शैला खाडे यांनी केले.
कार्यक्रम माधुरी नारखेडे याच्या पुढाकाराने आणि हेमराज किरंगे याचे सहकार्याने संपन्न झाला. यावेळी स्मार्ट चाॅईस सॅनिटरी पॅड चे प्रचारक छाया चौधरी भुसावळ उपस्थित होत्या.

महिलांच्या मासिक पाळीबाबत बऱ्याचदा महिला आणि मुलींमध्ये उदासीनता दिसून येते. परंतु या उपक्रमाला विद्यर्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एएस भंगाळे, शिक्षिका जयश्री चौधरी, श्रीमती लक्ष्मी उंबरकर, श्रीमती नयना खंडेराव, चैताली नेमाडे व लढे मॅडम यांचे सहकार्य लाभले.