⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

प्रदूषण रोखण्यासाठी रायसोनी महाविद्यालयात जनजागृती अभियान

जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । सध्या शहरात धुळीने व हवेच्या प्रदूषणाने अनेक नागरिक त्रस्त झाले आहे. याच बाबीचा अंदाज घेत जळगाव शहरातील रायसोनी महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले आहेत.

महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी काही दिवसांपासून प्रदूषण रोखण्यासाठी ‘युद्ध प्रदूषण के विरुद्ध’ हे अभियान सुरू केलं आहे. याअंतर्गत धुळीविरुद्ध अभियान सुरू करणं, वृक्षांची लागवड, प्लास्टिकचा वापर टाळणे, इलेक्ट्रॉनिक व्हेइकल पॉलिसी लागू करणं व शेतीतील पालापाचोळा जाळण्याऐवजी जैव विघटनाचं तंत्रज्ञान (Bio Decomposer Technique) वापरणं याचा समावेश आहे. या जनजागृती अभियानाची सुरुवात करत विध्यार्थ्यानी प्रदूषण मुक्तीचे फलक हातात घेत शिरसोली ते जळगाव या रस्त्यावर रॅली काढली तसेच प्रदूषण मुक्ती संदर्भातील पथनाट्य सादर केले. या विध्यार्थ्यांना सिव्हील अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. सिद्धार्थ पांडे यांचे मार्गदर्शन लाभले असून या अभियानाच्या पुढील वाटचालीसाठी रायसोनी इस्टीट्यूट चे संचालक श्री. प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.