⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

31 सकल लेवा पाटीदार मंडळांच्या सहभागाने पुरस्कार वितरण समारोह उत्साहात !

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ एप्रिल २०२३ | जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळ जळगांव, लेवा सम्राज्ञी फाऊंडेशन, जळगांव, भोरगाव लेवा पंचायत जळगांव विभाग आणि इतर 28 सकल लेवा पाटीदार मंडळ यांच्या सहभागाने दिनांक २३ एप्रिल रोजी सरदार पटेल लेवा हॉल, जळगांव या ठिकाणी अतिशय दिमाखात भव्य असा सत्कार सोहळा पार पडला.

सकल लेवा पाटीदार समाजातील प्रदीर्घ सेवा देणाऱ्या अण्णासाहेब पुरुषोत्तम निनू पाटील, मलकापूर यांना समाजकार्यासाठी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, पर्यावरण पूरक बुके, सन्मान पत्र आणि रोख रक्कम रु 11000/- असे होते. या सोबत तळागाळापर्यंत समाजकार्य करणाऱ्या 29 समाजसेवकांचा सन्मान शाल, पर्यावरण पूरक बुके आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

यात रवी पाटील – प्रतिभाग्रज, मुंबई, सचिन भोळे, नाशिक, जयंत कमलाकर झांबरे, ठाणे
अरविंद झोपे, थोरगव्हाण, धनंजय भास्कर कोल्हे, जळगांव, नरेंद्र विष्णू नारखेडे, फैजपूर, पवन चौधरी, अट्रावल, रमाकांत निवृत्ती भारंबे, गाडेगाव, नितीन नारायण सरोदे, नाशिक, ह भ प भरतमहाराज हरी पाटील, श्री क्षेत्र कुंडलेश्र्वर, हर्षल भंगाळे, डोंबिवली, पंकज किसन नाले, जळगांव, प्रवीण झांबरे, भरुच, अंकलेश्र्वर, आरती सारंग चौधरी, भुसावळ, पल्लवी पाटील चोपडे, नाशिक ,शिल्पा सरोदे, बंगलोर, अनिता सरोदे औरंगाबाद, सुनंदा सुहास नेमाडे, नागपूर, निलिमा अरविंद नेहेते, नाशिक, लिना संजय चौधरी, जळगांव, देवयानी किशोर कोलते, जळगांव, तृप्ती विजय पाटील, मुंबई, आशा चंद्रकांत पाटील, थोरगव्हाण ललिता शशिकांत पाटील, बोरिवली, डॉ प्रवीण अंकात पाचपांडे, मुक्ताईनगर, इंजिनीयर निर्णय चौधरी, जळगांव, आर्किटेक्ट विजय भंगाळे, जळगांव, इंजिनीयर केतन चौधरी, जळगांव, इंजिनीयर सचिन खडके, जळगांव यांचा समावेश होता.

या कार्यक्रमात प्रा.श्री व पू होले यांनी “समाजातील वाढत्या घटास्पोटात समाज मंडळांची भुमिका” तसेच “प्री वेडिंग शूट” यावर प्रकाश टाकला, श्री अरुण बोरोले यांनी प्री वेडिंग शूट विरोधात ठराव मांडला. डॉ मिलिंद पाटील यांनी सर्व समाज बांधवांसह अनुमोदन दिले व या नंतर सर्व समाजबांधवांनी प्रि वेडिंग शूट विरोधात ठराव पास केला. त्यानंतर या संदर्भात सामुदायिक शपथ घेण्यात आली. यावर ‘लेवा भातृ मंडळ, पिंपळे सौदागर’ यांचे कृष्णाजी खडसे यांनी कृती आराखडा सादर केला आणि त्या नुसार अंमलबजावणी करण्याचे ठरविले गेले.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण डॉ प्रमोद हरी महाजन, नाशिक यांनी अध्यक्षीय भाषणासोबत “घटस्फोटाची समस्या हाताळण्यासाठी समाजमंडळांनी काय करावे ” यावर प्रकाशझोत टाकला. जीवनगौरव पुरस्कार प्राप्त आण्णासाहेब यांनी पुरस्काराला भावनिक उत्तर दिलं. त्याचप्रमाणे पुरस्कार प्राप्त मंडळीतून सौ पल्लवी चोपडे पाटील नाशिक, सौ आशा चंद्रकांत पाटील, थोरगव्हाण, श्री रवि पाटील- प्रतिभाग्रज, मुंबई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुरस्कार प्राप्त ह भ प भरत महाराज, बेडीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि समाजाला मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे मा आ श्री नीळकंठ फालक, भुसावळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आदरणीय कुटुंब नायक श्री रमेश विठू पाटील, भोरगाव लेवा पंचायत, ठाया पाडळसे, मा नगराध्यक्ष श्री बंडू दादा काळे, श्री रवि चौधरी, पुणे, श्री नीळकंठ चौधरी, बोरिवली, पुरुषोत्तम पिंपळे, पुणे, सुरेन्द्र चौधरी, जळगांव, कृष्णाजी खडसे, पुणे, ऍड प्रकाश पाटील, भुसावळ, प्रा. श्री एस एस राणे, जळगांव, प्रा श्री अरुण पाटील, जळगांव, श्री के सी पाटील, जळगांव, ऍड प्रविणचंद्र जंगले, जळगांव, ऍड सौ ज्योती भोळे, जळगांव, सौ नीता वराडे, जळगांव, सौ नीला चौधरी, जळगांव, श्री रामानंद वारके, जळगांव यांची होती. या कार्यक्रमाला श्री मधुकर सरोदे औरंगाबाद, सौ वर्षा वाणी सुरत, श्री डी के देशमुख बुलढाणा,श्री दिलीप नाफडे मलकापूर, श्री अशोक चौधरी, श्री जगदीश फिरके , भोरगाव पाडलसे, श्री कीर्ती कुमार बोंडे,सुरत आणि अनेक मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व समाज मंडळांनी सहभाग नोंदवला. प्रामुख्याने श्री लीलाधर चौधरी, सौ ज्योती महाजन,कलावंत तुषार वाघुळदे ,ऍड.पुरुषोत्तम नेमाडे , ऍड तुळशीराम नेमाडे,विनोद हरी पाटील ,गजानन भोळे,सुनील बढे ,रविंद्र फिरके ,प्रकाश वराडे ,महेंद्र ज्ञानदेव पाटील ,नितीन वसंत इंगळे,चंद्रकांत बेंडाले,किशोर ढाके, यांच्यासह संगीता योगेंद्र पाटील, सौ सीमा गाजरे, सौ वैशाली कोळंबे, सौ मंगला पाटील भुसावळ , डॉ सौ स्मिता पाटील, श्री प्रवीण खडके, श्री जे एम पाटील. श्री उमाकांत बोंडे. श्री प्रल्हाद भारंबे गाडेगाव. डॉ भावना चौधरी, श्री विनीत पाटील , श्री अतुल बोंडे, सौ. चित्रा महाजन, प्रा सौ संध्या महाजन, कीर्तनकार सौ अलका वायकोळे, प्रवीण कोलते जामनेर, हर्षल जावळे आणि अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी सहभाग घेवून परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. त्या नंतर सहभोजनचा आनंद सर्वांनी घेतला.

या कार्यक्रमात प्रामुख्याने देणगीदार यांचा सहभाग लक्षणीय होता. त्यात श्री नितीन वसंत इंगळे, श्री नीळकंठ फालक,भुसावळ, श्री बंडू दादा काळे, खडके चौधरी कन्स्ट्रक्शन जळगाव,उद्योजक डॉ के सी पाटील, विदर्भ लेवा पाटीदार भात्रुमंडळ,जळगाव, श्री अरुण बोरोले, श्री चंद्रकांत बेंडाले , श्री किशोर ढाके, ऍड पी ई नेमाडे, भुसावळ, श्री प्रकाश वराडे, लेवा सम्राज्ञी फाउंडेशन, श्री विष्णू भंगाळे, सौ हर्षाली चौधरी, सौ सुनंदा नेमाडे नागपूर, श्री सुरेन्द्र चौधरी,थोरगव्हाण, श्री जयंत झांबरे,ठाणे, श्री प्रवीण झांबरे,भरूच, ऍड सुभाष बोरोले,जळगाव, श्री अण्णासाहेब पाटील मलकापूर यांनी मदतीचे हात दिले. तसेच अल्पदरात सेवा देवून चिरमाडे साऊंड सिस्टीम, अंबाजी टेंट यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अरुण बोरोले यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ मिलिंद पाटील आणि प्रा सौ सुनिता चौधरी यांनी केले.