भाड्याने घेतलेले दुकान खाली करण्याच्या वादातून सावद्यात एकावर विळ्याने वार

नोव्हेंबर 16, 2022 2:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । काकांच्या मालकीचे दुकान खाली करण्याबाबत विचारणा केल्यावरून एकावर विळ्याने वार करण्यात आल्याची घटना सावद्यात घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 2022 09 03T132219.635 jpg webp

हरेश उर्फ रामा सुभाष होले यांच्या काकांचे दुकान हे किरण प्रभाकर निंबाळे आणि आनंद रवींद्र जगताप या दोघांनी भाड्याने घेतले असून हे दुकान ते खाली करत नसल्याने रामा होले यांनी त्यांना याबाबत विचारणा केली. यामुळे किरण निंबाळे यांनी रीक्षातून विळा आणून त्यांच्यावर वार केला तर आनंद जगताप यांनी त्यांना पकडून ठेवले. या झटापटीत रामा होले यांच्या मनगटाला विळ्याच्या वार लागल्याने जखम झाली.

ही घटना सावदा शहरातील दुर्गा माता चौकातील सर्वज्ञ फर्निचर या दुकानाच्या समोर सायंकाळी सुमारे सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी हरेश उर्फ रामा सुभाष होले (45, रा. लक्कडपेठ, फैजपूर) यांनी सावदा पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यावरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now