⁠ 
सोमवार, ऑक्टोबर 14, 2024
Home | गुन्हे | अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न : जमावाने पेटवली दुचाकी

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न : जमावाने पेटवली दुचाकी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । जळगाव शहरातील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात आलेल्या तरूणाला नागरीकांनी पकडून बेदम मारहाण केल्याचा प्रकार धडला आहे.यावेळी त्याला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. १४ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एवढेच नाही तर संतप्त जमावाने तरूणाची दुचाकी पेटवून देखील दिली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

कोल्हे हिल्स परिसरातील एका भागात पत्र्याच्या घरात एक कुटुंबिय गेल्या १३ वर्षांपासून वास्तव्याला आहे. या ठिकाणी पती-पत्नी दोन मुले आणि दोन मुली वास्तव्याला आहे. शुक्रवार १४ जुलै रोजी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे आईवडील व दोन्ही भाऊ कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. त्यावेळी सोळा वर्षीय मुलगी व तिची सहा वर्षाची लहान बहिण घरीच होत्या. दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास चंदुअण्णा नगरात राहणारा तरूण हा दुचाकी (एमएच १९ डीक्यू ७१७८) ने मुलीच्या घराजवळ आला.

पाणी पिण्याचा बहाणा करून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पिडीत मुलीची सहा वर्षाची लहान बहिणीने आरडओरड केल्यानंतर परिसरातील नागरीकांनी धाव घेत संशयित तरूणाला रंगेहात पकडले. संतप्त नागरीकांनी तरूणाचा चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्यांची दुचाकी पेटवून दिली. हा प्रकार घडल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेत तरूणाला ताब्यात घेतले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

author avatar
टीम जळगाव लाईव्ह