⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

जळगावात कैदीचा गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२१ । शहरातील जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मंगळवारी सकाळी सुमारास कैद्याने रुग्णालयातच गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळीच प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्याने तो बचावला आहे.

न्यायालयीन कोठडीतील कैदी रवींद्र निकम (वय-२५) हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. या कैद्याने मंगळवारी सकाळी ९ वाजता वॉर्डातील पंख्याला चादरीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने वॉर्डातील पंखे काढून घेतले आहेत. निकम याला फिट येण्याचा त्रास आहे. जिल्हा रुग्णालयातील कैदी वार्डात त्याच्यासोबतचे दोन्ही कैदी झोपलेले असताना त्याने हा प्रकार केला. वॉर्डाबाहेर ड्युटी असलेले पोलीस हर्षल महाजन व विनय पाटील यांनी तात्काळ त्याचा जीव वाचवला.

‘मी स्वत: अर्ज लिहितो’
एमएपर्यंत शिक्षित असलेल्या निकमने घटनेनंतर पोलिसांना सांगितले, तुम्ही घाबरू नका, मी स्वतः अर्ज लिहितो, त्यात आत्महत्येचे कारणही लिहितो. भडगाव तालुक्यातील प्रेम प्रकरण व अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने तो तणावात आहे.