जामनेरात चोरट्यांनी आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडले, तब्बल ‘इतक्या’ लाखाची रक्कम लंपास
जळगाव जिल्ह्यात चोरट्याचा धुमाकूळ सुरूय. दिवसेंदिवस वाढत असलेल्या घरफोड्यांपाठोपाठ आता चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकून चक्क बँकेचे एटीएम फोडल्याची घटना घडलीय. जामनेर शहरातील पाचोरा रोडवर असलेल्या आयडीबीआय बँकेचे एटीएममध्ये मध्यरात्री धाडसी दरोडा टाकून सुमारे १२ लाख ७८ हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघकीला आला आहे. यामुळे शहरात खळबळ माजली आहे.
दरम्यान, चोरट्यांनी पोलीसांना सरळ सरळ आव्हानच दिल्याचे बोलले जात असून यामुळे शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. चोरी करतांना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असं की, शहरातील पाचोरा रोडवर असलेल्या आयडीबीआय बँक एटीएम रात्रीच्यावेळी चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने फोडले. बुधवार २६ जानेवारी रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास हे एटीएम फोडले आहे. अवघ्या १५ मिनीटात एटीएम मधील पैसे चोरून नेले. रीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला. सदर घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. सदर या बँकेच्या एटीएम जवळ कोणते प्रकारे सुरक्षारक्षक नसल्यामुळे एटीएममध्ये चोरी झाल्याची चर्चा आहे .
ही माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे, पोलीस नियाप्रकरणी शाखाधिकारी प्रसुन परेशनाथ घोष (वय-३६) रा. जामनेर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांवर गुन्हा दाखल
- जळगावात चाकूचा धाक दाखवून वाइन शॉप चालकाला मागितली खंडणी; गुन्हा दाखल
- बसच्या धडकेत सैन्य दलातील जवान गंभीर जखमी; जळगाव शहरातील घटना