⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

आई ड्युटीवर जाताच घरी एकटी असलेल्या १७ वर्षीय मुलीने.. जळगावातील धक्कादायक घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२३ । जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही अल्पवयीन मुलगी जळगाव शहरातील एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिने आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे घटना
जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरातील ही अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत राहत होती. अल्पवयीन मुलीची आई जिल्हा परिषदेत नोकरीला आहे. त्या नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेल्या होत्या. शुक्रवारी ही अल्पवीयन मुलगी घरी एकटी असताना तिने ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी सात वाजता जेव्हा आई घरी आली तेव्हा तिच्या हृदयाचा ठोका चुकला. त्यांना त्यांची मुलगी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. हे दृष्य पाहताच त्यांनी मोठा आक्रोश केला.

घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. त्यांनी मृतदेह खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात हलविला. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक जाधव यांनी अल्पवयीन मुलीला मृत घोषित केले.

ही अल्पवयीन मुलगी जळगाव शहरातील एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिने आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. याबाबत डॉ. दीपक जाधव यांच्या माहितीवरुन रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अजित पाटील हे करीत आहेत.