⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, चार जणांविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, चार जणांविरुद्ध गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील एका गावातुन १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकणी रविवारी दि. १ मे रोजी चार जणांविरूध्द येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातुन १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला दि. २७एप्रिल रोजी पहाटे गावातील तरूण चंद्रकांत उर्फ भुषण आत्माराम सोनवणे (कोळी) याने एका मित्राच्या मदतीने अपहरण केले. त्या अल्पवयीन मुलीस नासिक येथील नातेवाईकांकडे नेऊन अत्याचार केले. रविवारी दि. १मे रोजी अल्पवयीन मुलगी घरी परतली व घडलेली घटना कुटुंबियांना सांगीतली. याप्रकरणी येथील पोलिसांत या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता. अल्पवयीन मुलगी घरी पतल्याचे समजताच पोलिसांनी अल्पवयीन व चंद्रकांत उर्फ भुषण सोनवणे (कोळी)यांना ताब्यात घेतले व नाशिक येथील त्याला मदत करणारे दाम्पत्य असे चार जणांविरुद्ध यावल पोलिसात बालकांचे लैगीक अत्याचार पासुन सरंक्षण कायदा पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी भुषण सोनवणे (कोळी) यास अटक करण्यात आली असून इतर तीघांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. पुढील तपास यावलचे पोलिस निरिक्षक आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर, सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह