जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । येथे दोन दिवसापुर्वी प्रेम प्रकरणातून एका तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्यातील तिघं संशयीतांना पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत येथील पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, जावेद युनुस पटेल (वय २२ रा. देशपांडे गल्ली, यावल) हा मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो.
त्यास फैजपूर येथील शेख मुजम्मील उर्फ मुज्जू शेख हकीम (वय २६), हिदायत आली उर्फ राजू शेखावत (वय २०), शेख शोएब शेख इकबाल खाटिक (वय २९)( तिघे राहणार ताहानगर फैजपूर) यांनी शुक्रवारी (ता.६) रोजी दुपारी अडीच ते साडेतीन वाजेच्या दरम्यान भुसावळ रस्त्यावरील हजरत घोडे पीर बाबांच्या दर्ग्याजवळील खोलीच्या मागे प्रेमप्रकरणातून चाकूने प्राणघातक हल्ला करून जखमी केले होते. जखमी जावेद पटेलवर जळगाव येथे सिव्हील हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.
याप्रकरणातील तीघ आरोपी घटनेपासून फरार होते. त्यांना फैजपुर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ . कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक आशित कांबळे , पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर यांच्यासह पोलीस पथकांनी शुक्रवार (ता. ६) रात्री उशिरा अटक केली आहे.