---Advertisement---
जळगाव जिल्हा

जपानच्या मिझुहो बँकेच्या भारतातील शाखेतर्फे रणनितीकार म्हणून अस्मिता पाटीलांची निवड

---Advertisement---

देशभरातून ४० जणांचा समावेश ; सौरव गांगुलींच्या हस्ते सन्मान

asmita vagh

जळगाव लाईव्ह न्यूज । जपान येथील प्रमुख बँक असलेल्या मिझुहोचे कामकाज भारतात सुरू झाले असून या बँकेच्या आर्थिक रणनितीसाठी वय वर्र्षे ४० च्या आत असलेले देशभरातील ४० अष्टपैलूंमध्ये अस्मिता सौरभ पाटील यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान या निवडीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि जिंदाल समूहाचे पार्थ जिंदाल यांच्या हस्ते अस्मिता पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

---Advertisement---

मिझुहो बँक ही जपानमधील प्रमुख बँकांपैकी एक आहे. या बँकेने भारतात देखिल आपले कामकाज सुरू कले आहे. यासाठी कॉर्पोरेट एक्झीक्युटीव्हजचे अखिल भारतीय सर्वेक्षण करण्यात आले. यात निराकरणकर्ता, रणनितीकार आणि अष्टपैलू आणि वय वर्षे ४० च्या आतील अशा ४० जणांची निवड करण्यात आली.

गोदावरी फाउंडेशनचे उपाध्यक्ष असलेले सुभाष पाटील यांच्या स्नुषा अस्मिता सौरभ पाटील यांचा देखिल समावेश आहे. अस्मिता पाटील ह्या आरसीएफ केमीकल येथे कार्यरत आहे. अस्मिता पाटील यांचा या निवडीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली, जिंदाल समुहाचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर पार्थ जिंदाल आणि मिझुहो बँकेचे सीईओ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अस्मिता पाटील यांची निवड ही जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या निवडीबद्दल श्रीमती गोदावरी पाटील, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील यांनी कौतुक केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---