जळगाव शहर

जळगाव शहरात पाण्याची टंचाई होताच ‘जार’चे दर वाढले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरामध्ये पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. अचानक आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे हा पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. मात्र ही तांत्रिक अडचण महानगरपालिका प्रशासनाने सोडवली आहे लवकरच महानगरपालिकेचा पाणीपुरवठा सुरू होईल. या सगळ्यात जळगाव शहरातील नागरिकांच्या घरातील पाणी संपले आहे. अशावेळी पिण्याच्या पाण्यासाठी जळगाव शहरातील नागरिक जार (water jar) विकत घेत आहेत. मात्र काही जार व्यवसायिकांनी आता जारची किंमत देखील वाढवली आहे.

इतर वेळी जार विकत घेण्यासाठी नागरिकांना २५ ते ३० रुपये मोजावे लागत होते. मात्र अचानक आलेल्या पाण्याच्या टंचाईमुळे जारची हीच किंमत 3५ ते ४० रुपये करून ठेवली आहे. यामुळे नागरिकांच्या गैरसोयीच्यावेळी व्यवसायिकांनी आपल्या जारची किंमत वाढवली आहे.

नागरिकांकडून जार व्यवसायिक २०० रुपये घेतात. यामध्ये १५० रुपये हे डिपॉझिट स्वरूपात असतात. जेणेकरून नागरिक त्यांच्या जार परत आणून देतील. जार पुन्हा आणून दिला कि, व्यावसायिक नागरिकांना १६० – १६५ रुपये परत देतात. अश्यावेळी नागरिकांना एक जार ३५ ते ४० रुपयांपर्यंत पडतो.

पाणीटंचाई होण्याआधी हेच दर वीस ते पंचवीस रुपयापर्यंत होते. मात्र शहरात असलेली पाण्याची टंचाई लक्षात घेता. जार व्यवसायिकांनी आपल्या जारची किंमत वाढवण्याचे निदर्शनास आले आहे. दुसरीकडे नागरिकांकडे इतर कोणताही पर्याय नसल्यामुळे नागरिकांना अधिक दहा रुपयांचा भुर्रदंड सहन करावा लागत आहे.

याबाबत ज्ञानेश्वर या जार व्यवसायिकांशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले की, जारच्या किमतीमध्ये कोणतेही वाढ करण्यात आलेली नाही. कारण ज्या व्यक्तींना आम्ही रोज जारचा वाटप करतो त्यांच्याकडून आम्ही अधिकचे पैसे घेतलेले नाहित. उलट फक्त ज्यांनी ऐनवेळी जार उपलब्ध करून देण्याची मागणी केली अशा लोकांकडूनच ते पैसे घेतले आहेत. तेही केवळ दहा रुपये. कारण त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या गाडीला लागणारे पेट्रोल व कामगारांना होणारे कष्ट.

Related Articles

Back to top button