जळगाव शहर महानगरपालिका व विविध संघटनांतर्फे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी

नोव्हेंबर 28, 2021 5:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । महिला व दलितांच्या सर्वांगीण विकासासाठी जिवन समर्पित करणारे , देशाला सत्यशोधक विचारांचा वारसा देणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतीथी निमित्ताने फुले मार्केट येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला व फुले नगर येथील महात्मा फुले यांच्या प्रतिमेला महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

abhivadan 1 jpg webp

यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या कार्याला उजाळा दिला. अभिवादनाच्या कार्यक्रमाला महापौर जयश्री महाजन, महाराष्ट्र जनक्राती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, छावा मराठा युवा महासंघाचे अमोल कोल्हे, हरिश्चंद्र सोनवणे, रमेश सोनवणे, दिलीप सपकाळे, वाल्मिक सपकाळे, महेंद्र केदारे, राजू सोनवणे, महात्मा फुले समता परिषदेच्या निवेदिता ताठे, संतोष इंगळे, सुभाष माळ, नंदू माळी, महानगरपालिकेचे चंद्रकांत वांद्रे, गोपी सपकाळे, शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ पाटील, कार्याध्यक्ष अजय पाटील, पंकज गरुड, किशोर पाटील, पद्माकर चौधरी, अजित चौधरी, मानव भालेराव यांच्यासह आदी उपस्थित होते.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now