---Advertisement---
बातम्या महाराष्ट्र राजकारण

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती स्थगित; ही आहेत कारणे?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२५ । महाराष्ट्रातील राजकीय धोरणात आलेला नवीन वळण अनेकांना आश्चर्याचा ठरला आहे. शनिवारी रात्री महायुती सरकारने जिल्ह्यांमधील पालकमंत्रिपदांच्या नावाची यादी जाहीर केली. यानंतर अवघ्या काही तासात नाशिक (Nashik) व रायगड (Raigad) जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला आता स्थगिती देण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजवून सोडली आहे.

eknarh shinde jpg webp webp

विशेष म्हणजेच भाजपचे संकटमोचक असलेले मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु आता ही नियुक्ती स्थगित करण्यात आल्याने मंत्री महाजन यांना मोठा धक्का मानला जात आहे. खरंतर नाशिकमध्ये अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ७ आमदार तर भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत. दुसरीकडे गेल्या महायुती सरकारमध्ये नाशिकचे पालकमंत्री पद शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे (Dada Bhuse) होते. त्यांनी कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री न घेण्याचे ठरवले, यातूनच स्थगिती मिळाली.

---Advertisement---

दुसरीकडे अजित पवार गटाच्या नेत्या अदिती तटकरे (Adiयांना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, शिवसेना पक्षातील काही नेत्यांनी या नियुक्तीला विरोध दर्शवला होता. शिवसैनिकांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने ही नियुक्ती स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पुढील आदेश येईपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---