⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

माफी मांगो.. माफी मांगो.. भगतसिंग कोश्यारी माफी मांगो : देवेन्द्र मराठे

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२२ । महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई येथील एका कार्यक्रमाच्या भाषणादरम्यान १२ कोटी महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान होईल असे बेताल अपशब्द वक्तव्य केलं. या वक्तव्याचा जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जाहीर केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर निषेध व्यक्त केला.

राज्यपाल महोदयांच्या, वक्तव्याचा समाचार घेत मराठे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य व प्रामुख्याने मुंबई तिने कधीही कुठल्याही व्यक्तीच्या जाती-धर्माचा विचार न करता व मतभेद न करता भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्व जातीपाती धर्माच्या लोकांना मुंबई व महाराष्ट्राने आश्रय देत तिथे हे लोक अतिशय आनंदाने वास्तव करत पोट भरत आहे.

परंतु राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्या दरम्यान केवळ राजस्थानी व गुजराती लोकांकडेच पैसा आहे व या लोकांना बाजूला केले तर महाराष्ट्रात व प्रामुख्याने मुंबईमध्ये पैसा राहणार नाही व मुंबई ही जी भारताची राष्ट्रीय आर्थिक राजधानी आहे ही राहणार नाही अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य राज्यपाल महोदय यांनी केले.

राज्यपाल पद हे संविधानिक दृष्ट्या अतिशय महत्वाचं पद असतं, राज्यपाल पदावरती असलेल्या व्यक्तीने राज्यपाल पदाची गरिमा कधीही कमी होऊ नये या पद्धतीची काळजी घेतली गेली पाहिजे, परंतु महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पदाची जबाबदारी जेव्हापासून भगतसिंग कोश्यारी यांनी घेतली तेव्हापासून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांनी या पदाची गरिमा कशी कमी होईल या पद्धतीचा कृत्य केलेलं आपल्या सर्वांनी बघितलेला आहे.

राज्यपाल पदावरती असलेल्या व्यक्तीला त्या राज्यातील सर्व जाती धर्माची जनता ही सर्व समान असते. त्याच पद्धतीने ही व्यक्ती कुठल्याही पक्षाची अथवा कुठल्याही पंथाची एकाच बाजूने साथ देऊ शकत नाही.

या व्यक्तीला राज्यातील सर्व जनता त्याच पद्धतीने सर्व राजकीय पक्ष हे सर्व समान असतात. परंतु भगतसिंग कोश्यारी यांनी मात्र या संपूर्ण तत्वांना तळा देत त्यांनी केवळ त्यांना योग्य वाटत त्याच पद्धतीचा कारभार संपूर्ण राज्यामध्ये सुरू ठेवलेला आहे व त्याच्याच माध्यमातून त्यांनी काल हे बेताल वक्तव्य केले त्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण १२ कोटी जनतेच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहे व जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्र राज्यातील १२ कोटी जनतेची तात्काळ माफी मागावी या पद्धतीची मागणी देखील जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केलेली आहे.