Sunday, December 4, 2022

पावसाचा दुसरा बळी : अंगावर वीज पडल्याने शेतमजूर ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । चोपडा तालुक्याच्या जुना नवागाव गडरापाडा येथील शेतमजूर पिंटू पावरा (वय ३४) यांच्या अंगावर वीज पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. दरम्यान, हा पावसाचा दुसरा बळी आहे. दि. ९ रोजी पाचोरा तालुक्यातील गाळण बु” येथील एका ४६ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात काम करत असतांना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. याबाबत अडावद पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

- Advertisement -

जुना नवागाव गडरापाडा येथील शेतमजूर पिंटू पावरा (वय ३४) यांच्या अंगावर वीज पडल्याने, नातेवाईकांनी त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मयत स्थित दाखल करण्यात आले होते. दरम्यान, येथील डॉक्तरांनी मृत्यू घोषित केले. अडावद पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ, नसीर तडवी करीत आहे.

- Advertisement -
[adinserter block="2"]