जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । आठ आणि पाच वर्षाच्या दोन बालिकांसोबत एका ६२ वर्षाच्या वृद्धाने अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना धरणगाव शहारत एका भागात उघडीस आली आहे. चंदुलाल शिवराम मराठे ( वय ६२) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. दरम्यान, एका चिमुकलीवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की, धरणगावातील एका परिसरात चंदुलाल शिवराम मराठे (वय-६२) याची पीठाची गिरणी आहे. परिसरात राहणारी एक महिला दिनांक २० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आपल्या आठ आणि सहा वर्षाच्या बालिकेंसह दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणीवर आली. दोघी चिमुकल्या मुली अंगणातच खेळत होत्या. दळण दळून त्यांची आई घरी निघून गेली. उशीर झाला तरी मुली घरी न आल्यामुळे आई त्यांना घेण्यासाठी परत आली. त्यावेळी चंदुलाल मराठे याने दोन्ही मुलींना आक्षेपार्ह अवस्थेत आपल्या मांडीवर घेतल्याचे आईच्या लक्षात आले. तिने संताप व्यक्त करून दोन्ही मुलींना घरी आणले. गरीब कुटुंबातील आई हा प्रकार पाहून हादरून गेली होती.
दरम्यान, सहा वर्षाच्या बालिकेने चक्कीवाल्या बाबाने आपल्यालाही मांडीवर बसवले असे सांगताच आई हादरली. कामावर गेलेला नवरा घरी परतताच तिने सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. पतीसह दोघी मुलींना घेऊन या महिलेने सायंकाळी पोलिस स्टेशन गाठले. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून उशिरा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या सहा वर्ष वयाच्या पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नेले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला. पुढील तपासणीसाठी या बालिकेला तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिवराम मराठे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान चंदुलाल मराठेचा मुलगा भूषण मराठे याने पोलीस स्टेशन मध्येच पीडितेच्या आईला धमकावण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची चर्चा वार्यासारखी पसरली आणि रात्री संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशन आवारात गर्दी केली. या संतापजनक घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
- पालजवळच्या बोरघाटात मजुरांना घेऊन येणाऱ्या पिकअपचा अपघात; एक ठार २१ जखमी
- प्रेमाच्या जाळ्यात फसवून तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न फसला ; जळगावात दोघांवर गुन्हा दाखल
- जळगाव शहरात भीषण अपघात : दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू
- मुक्ताईनगरजवळ ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात ; २ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
- सुरतच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जळगावातील हॉटेलमध्ये नेलं अन्.. पुढे घडलं धक्कादायक