जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील मुक्ताई महिला भजनी मंडळातर्फे गावातील गरजू महिलांना साडीवाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या हस्ते महिलांना साडीवाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना देवकर म्हणाले की, मुक्ताई महिला भजनी मंडळाने आपल्या गरजू भगिनींसाठी आज स्तुत्य उपक्रम राबवला आहे. अशा समाजोपयोगी उपक्रमांची गरज असून, त्यासाठी दात्यांनी पुढाकार घेतला पाहिजे व अशा मंडळातील महिलांचा आत्मविश्वास वाढवायला पाहिजे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवकर, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मंडळाच्या संस्थापक सुरेखाताई विजय माळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी धनराज माळी, मोहन पाटील, रवींद्र पाटील, देवरे आबा, दिलीप अण्णा, धर्मा पाटील, हितेंद्र पाटील, प्रकाश पाटील, उमेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रभाकर पाटील, लीलाधर पाटील, नातू पाटील, अभिमन्यू पाटील, नामदेव पाटील, रावण पाटील, नारायण महाजन, भिला पाटील, शिवदास पाटील, विरभान पाटील, प्रमोद महाजन यांच्यासह भजनी मंडळातील महिला व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.