⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | खा. सुप्रिया सुळे यांच्यावरच्या वक्तव्याचा निषेध म्हणून मंत्री सत्तारांची प्रतिमा जाळली

खा. सुप्रिया सुळे यांच्यावरच्या वक्तव्याचा निषेध म्हणून मंत्री सत्तारांची प्रतिमा जाळली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ ।  खासदार सुप्रिया सुळे व महिलांबद्दल बेताल व आक्षेपार्ह्य विधान करणार्‍या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा शहरातील राष्ट्रवादी पदाधिाकर्‍यांनी निषेध केला. सोमवारी सायंकाळी प्रवर्तन चौकामध्ये सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमा जाळण्यात आली. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घयावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून शिंदे सरकारच्या विरोधात आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, रोहिणी खडसे,  राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.पवनराजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आंदोलनप्रसंगी निवृत्ती पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.पवनराजे पाटील, शहराध्यक्ष राजू माळी, बापू ससाणे, संदीप पाटोळे, जितेंद्र  पाटील, विजय कापसे, निखील पाटील, कपिल पाटील, प्रमोद भालेराव, अतुल पाटील, प्रदीप पाटील, नितीन पाटील, सारंगराजे, वैभव पाटील, राहुल पाटील, रोशन पाटील, योगेश पाटील, आकाश सुरवाडे, मनोज इंगळे, जयराज इंगळे, सोपान कोळी, ज्ञानेश्वर भोई, सद्दाम शेख, सारंगराजे, दीपक पाटील, गणेश चौधरी, चेतन पाटील, तेजस कोळी, शुभम पाटील, वैभव पाटील, विशाल पाटील, विवेक पाटील, मयूर पाटील, रवी सुरवाडे, जुबेर खान, यांच्या सह राष्ट्रवादीचे  कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

author avatar
टीम जळगाव लाईव्ह