१८ वर्षाच्या तरुणाने २० वर्षीय तरुणीवर केला जबरी आत्याचार !

मुक्ताईनगर तालुक्यातील २० वर्षीय तरुणीवर एकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित संशयिताला अटक करण्यात आली आहे.

crime 1 jpg webp

मुक्ताईनगर तालुक्यातील झोपडपट्टी भागामध्ये २० वर्षीय तरूणी आपल्या नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. ९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता सुमारास तरुणीही शौचालयाला जात असतांना गावात राहणारा सागर सुरेश शिंदे (वय-१८) या तरुणाने तिला जबरी हात पकडून खोलीत नेऊन तिच्यावरती जबरी अत्याचार केला. यानंतर पीडित तरुणीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला.

१२ मे रोजी रात्री ११ वाजता पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सागर सुरेश शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दोनगहू यांनी संशयित आरोपी सागर शिंदे याला अटक केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now