---Advertisement---
बातम्या महाराष्ट्र वाणिज्य

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! अमूलने दुधाच्या किंमतीत केली कपात, नवे दर पहा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । वाढत्या महागाईतून दिलासा देणारी एक बातमी समोर आलीय. अवघ्या एक दिवसावर प्रजासत्ताक दिन आला असताना यानिमित्ताने अमूलने दुधाच्या किमतीत घट केली आहे. अमूलने आपल्या तीन प्रमुख प्रकारच्या दुधाच्या किंमती (Amul Milk) प्रति लिटर 1 रुपयाने कमी केल्या आहेत. यामध्ये अमूल गोल्ड, अमूल टी स्पेशल आणि अमूल फ्रेश या प्रकारांचा समावेश आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

amul milk

नवीन दर असे?
यापूर्वी अमूल गोल्ड दूध 66 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होते, ते आता 65 रुपयांना मिळणार आहे. अमूल टी स्पेशल दूध 63 रुपयांवरून 62 रुपयांवर आले असून, अमूल फ्रेश दूध 54 रुपयांऐवजी 53 रुपयांना मिळणार आहे. याबाबतची माहिती अमूलने अधिकृत निवेदन जाहीर करत दिली आहे.

---Advertisement---

काही तज्ज्ञांच्या मते, बाजारातील वाढती स्पर्धा आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन कंपनीने दुधांच्या किमतीत घट केली आहे. परंतु, या निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा आहे. आता या दूधदर कपातीचा फायदा फक्त घरगुती ग्राहकांनाच नव्हे, तर व्यवसायिकांना देखील होणार आहे. हॉटेल्स, कॅंटिन्स आणि इतर दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या व्यवसायांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---