जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२२ । अमळनेर-तालुक्याचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील 30 खाटांचे ग्रामिण रुग्णालय रुग्णसेवेच्या दृष्टीने अपुरे पडत असताना आ. अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने याच रुग्णालयाचे 50 खाटांच्या उपजिल्हारुग्णालयात रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला असून आमदारांच्याच प्रयत्नाने रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी 7.32 कोटी रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
येत्या मार्च मध्ये होणाऱ्या बजेटमध्येच सदर निधी प्राप्त करून तातडीने बांधकाम सुरू केले जाईल असा विश्वास आ.अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. अमळनेर तालुका व मतदारसंघाच्या दृष्टीने हे अतिशय मोठे आणि आवश्यक काम आमदारांनी मार्गी लावले असून यामुळे अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांना धुळे अथवा बाहेरगावी पाठविण्याचा त्रास कायमचा बंद होऊन मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
कोविड कालावधीपासून सुरू केले आमदारांनी प्रयत्न,
कोविड कालावधीपासून आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर ग्रामिण रुग्णालयाकडे विशेष लक्ष केंद्रित केले होते, आमदारांच्या प्रयत्नाने रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध होऊन 85 लाख निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारला गेला, मात्र यादरम्यान रुग्णांसाठी बेड संख्या अपूर्ण पडल्याने इंदिरा गांधी भवनात अतिरिक्त बेडची व्यवस्था करावी लागली होती, याशिवाय बाहेरील तज्ञ व इतर जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांची मदत घेऊन रुग्णसेवा द्यावी लागली, यामुळे कुठल्याही परिस्थितीत या ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हारुग्णालयात रूपांतर करायचेच असा निर्धार पाटील यांनी करून त्या दृष्टीने शासनदरबारी आरोग्य मंत्रालयाकडे जोमाने प्रयत्न सुरू केले होते, गेल्या आठ दिवसांपासून मुंबई मध्ये मंत्र्यांकडे ठाण मांडून सदर उपजिल्हारुग्णालयाच्या इमारतीसाठी तयार केलेल्या 7.32 कोटीच्या अंदाजपत्रक व आराखड्यास आमदारांनी प्रशासकीय मान्यता मिळविल्याने इमारत बांधकामास हिरवा कंदील मिळाला आहे, सदर मान्यतेबाबत शासनाच्या आरोग्य विभागाने दि 8 फेब्रुवारी रोजी आदेश काढले आहेत.
उपजिल्हारुग्णालयात असणार सर्व तज्ञ डॉक्टरांची टीम
अमळनेर ग्रामिण रुग्णालयात सद्यस्थितीत बऱ्यापैकी सोई सुविधा असल्या तरी तज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याने अपघातग्रस्त किंवा गंभीर आजाराच्या रुग्णांना बाहेरगावचा रस्ता धरावा लागत असतो मात्र हेच उपजिल्हारुग्णालय परिपूर्ण झाल्यानंतर याठिकाणी सर्व आजारांचे तज्ञ डॉक्टर पूर्णवेळ उपलब्ध होणार असून उपचारासाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक मशीनरीज व सोई सुविधा देखील उपलब्ध होणार आहे, याशिवाय स्टाफ ची देखील संख्या वाढून रुग्णालयाचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
अमळनेर मतदारसंघातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने आमदारांच्या प्रयत्नांनी ही उपयुक्त भेट मिळणार असल्याने आमदार अनिल पाटील यांचे विशेष कौतुक होत आहे.
हे देखील वाचा:
- महिन्याला 1000 ते 5000 रुपयांच्या SIP मुळे तुम्ही कोट्यधीस कधी व्हाल? जाणून घ्या हे गणित..
- शेअर्समध्ये गुंतवणूक करायची नाहीय? मग FD मध्ये गुंतवणूक करा; SBI, HDFCसह ‘या’ बँका देताय ‘इतके’ व्याज?
- मामाकडे राहणाऱ्या तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल ; जळगावातील घटना
- पंजाब नॅशनल बँकेत 12 वी पास उमेदवारांसाठी संधी; किती पगार मिळेल?
- -30अंशातही प्रवास सुरळीत होईल; जम्मू-श्रीनगर ‘वंदे भारत’चा पहिला लूक समोर..