बातम्याराष्ट्रीय

मोठी बातमी ! अल्लू अर्जुनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२४ । मागील अनेक दिवसांपासून पुष्पा 2 चित्रपटामुळे चर्चेत असलेला साऊथचा सुपरस्टार अल्लु अर्जुनबाबत मोठी अपडेट आली आहे. अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली आहे. ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता.

काय आहे प्रकरण?
4 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत याप्रकरणी 5 डिसेंबर रोजी शहर पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता.

मृत महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जुनविरोधात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी थिएटर मालकांपैकी एक, थिएटरचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि थिएटरच्या खालच्या बाल्कनीचे प्रभारी या तीन जणांना अटक केली. तर याविरोधात बुधवारी अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अल्लू अर्जुनने एफआयआर रद्द करण्याची याचिका दाखल करत याचिका निकाली निघेपर्यंत अटकेसह पुढील सर्व कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली होती. मात्र पोलिसांनी याप्रकरणी आता अल्लू अर्जुन याला अटक केली आहे. अल्लू अर्जुन याला घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलेय. पोलिस पुढील चौकशी करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button