महाराष्ट्र

तळीरामांनो लक्ष द्या! २ ऑक्टोबरला महाराष्ट्रात मद्यविक्रीची सर्व दुकाने राहणार बंद

जळगाव लाईव्ह न्यूज । तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी असून उद्या, म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्रात मद्यविक्री बंद राहणार आहे. त्यामुळे राज्यातील परवानाधारक वाईन शॉप्स, बिअर शॉपी, देशी दारूची दुकाने तसेच मद्यविक्रीची परवानगी असलेल्या हॉटेलमधील परमिट रूम्सना ड्राय डेच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

महाराष्ट्रात कायद्यानुसार काही विशिष्ट दिवशी मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात येतात. मुंबई प्रोव्हिजन अॅक्ट, १९४९ अंतर्गत परवानाधारक मद्यविक्रीची ठिकाणे निश्चित दिवशी बंद ठेवण्याची तरतूद आहे. महात्मा गांधी जयंती हा त्यापैकी एक दिवस आहे.

ऑक्टोबर २०२६ मध्ये २ ऑक्टोबर (गांधी जयंती) आणि २० ऑक्टोबर (दसरा/विजयादशमी) या दिवशी मद्यविक्रीवर बंदी राहणार असल्याची नोंद आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून लागू करण्यात येणाऱ्या आदेशांनुसार नियमांमध्ये बदल किंवा अतिरिक्त निर्बंध असू शकतात.

ड्राय डेचा उद्देश राष्ट्रीय, धार्मिक किंवा सार्वजनिक महत्त्वाच्या दिवसांमध्ये कायदा-सुव्यवस्था राखणे, मद्यविक्रीमुळे होणारे अनुचित प्रकार टाळणे आणि गर्दीच्या काळात प्रशासनाला परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे हा आहे.

त्यामुळे २ ऑक्टोबरला मद्यविक्री बंद राहणार असल्याने मद्यप्रेमींनी याची नोंद घ्यावी. तसेच दसऱ्याच्या दिवशी लागू असलेल्या स्थानिक आदेशांची माहिती घेण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button