जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात बऱ्याच दिवसांनी एकाच दिवशी ९ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असतानाच नाशिकमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच परदेशातून नाशिकला आलेल्या एका महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला असतानाच आजची बातमी समोर आली आहे.

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रँडम तपासणीमध्ये गेलेल्या जेनॉम् सिक्वेंसिंगमध्ये नाशिक शहरात पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आलेला आहे. या रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. परंतु या व्हरिएंटच्या प्रसाराची गती विचारात घेता सर्व सूचनांचे नागरिकांनी स्वतःहूनच व्यवस्थित पालन करणे आवश्यक आहे.
स्वतःचे लसीकरण करून घेणे हे यावरील सर्वात महत्वाचे सुरक्षाकवच आहे. त्यामुळे उरलेल्या नागरिकांनी तातडीने स्वतःचे लसीकरण करून घ्यावे असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी आवाहन केले आहे. नाशिकच्या रूपाने उत्तर महाराष्ट्रात ओमायक्रॉनने धडक दिली असून नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
- चीनमधील HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एन्ट्री; नागपुरात दोन रुग्ण आढळले, राज्य सरकार अलर्टवर
- जळगाव जिल्ह्यात कोरोनाची एंन्ट्री; एक जण कोरोना पॉझिटिव्ह
- सावधान! कोरोनानंतर आता ‘या’ धोकादायक आजाराचे जगात थैमान ; WHO कडून अलर्ट जारी
- वाकोदला कृषीचे पदवी महाविद्यालय सुरू करावे ; शरद पवारांचा अशोक जैन यांना सल्ला
- धोक्याची घंटा! नव्या कोरोना व्हेरिएंट ‘इरिस’ची यूकेत लाट, भारतासाठी धोका?