Jalgaon : भाजपकडून जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांच्या नावाची घोषणा, डॉ. राधेश्याम चौधरींसह यांना मिळाली संधी..

मे 13, 2025 3:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२५ । आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज राज्यभरातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्या नावाची घोषणा केली आहे.

radheshyam chaudhari

यात जळगाव पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी जामनेरचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांची निवड करण्यात आलेली आहे. तर जळगाव पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच जळगाव महानगर अध्यक्षपदी पुन्हा एकदा दीपक सूर्यवंशी यांना संधी मिळाली आहे.

भाजपने दोन मराठा व एक गुजर पदाधिकाऱ्यांवर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून सामाजिक संतुलन साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पक्षासाठी केलेल्या कामाची पावती त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळवून देण्यास कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे.

चंद्रकांत बाविस्कर यांनी जामनेर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली असून ते गिरीशभाऊ महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. यामुळे त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दीपक सूर्यवंशी यांनी याआधी देखील महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळलेली असल्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment