अरेरे.. जळगावात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या महिलेची मंगलपोत लांबवली!

सप्टेंबर 30, 2022 6:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यात चोरीचे सूत्र सुरूच असून पुन्हा शहरातील पिंप्राळा परिसरातून बुधवारी आठवडे बाजरात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या महिलेची ५० हजार रुपयांची मंगलपोत चेारट्यांनी तोडून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 19T130246.736 jpg webp

जळगाव शहरातील भिकमचंद जैन नगरा जवळील वाघोदे नगरातील कल्पना संजय पाटील (वय- ३०) या बुधवारी भाजीपाला खरेदी करण्यााठी पिंप्राळ्यात भरणाऱ्या आठवडे बाजारात आल्या होत्या. बाजार करत असतांना सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किंमतीची मंगलबोत अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. कल्पना पाटील यांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक राजेश्‍ चव्हाण करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now