⁠ 
[rank_math_breadcrumb]

निकालानंतर अजित पवारांची मोठ्या पदावर वर्णी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२४ । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला असून महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवारांनी एका मोठ्या पदावर वर्णी लागली आहे.

महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटात हालचालींना वेग आला आहे. सध्या अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर अनेक आमदार त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यावेळी त्यांची सर्व आमदारांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड करण्यात आली आहे.

अजित पवारांची गटनेता म्हणून नियुक्ती
देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदार उपस्थितीत होते. यावेळी सर्व आमदारांनी एकमताने अजित पवारांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड केली. त्यामुळे आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांंनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा बोलून दाखवली आहे. तसेच ठिकठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनरही लागले आहेत. मात्र अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे सांगितले आहे.

आज संध्याकाळी शिंदे गटाचा गटनेता ठरणार?
दरम्यान महायुतीमध्ये भाजपचे 132 तर शिवसेनेचे 57 आमदार विजयी झाले आहेत. तर अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे 41 आमदार विजयी झाले आहेत. यानंतर आज अजित पवार यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली.

तर दुसरीकडे शिवसेना शिंदेंच्या पक्षाचे आमदार मुंबईत यायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलमध्ये या सर्व आमदारांना ठेवले आहे. सध्या या हॉटेलमध्ये साधारण ३० ते ३५ आमदार उपस्थितीत आहे. अनेक आमदार हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. ग्रामीण भागातील आमदारांना पोहोचायला वेळ लागत आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत सर्व आमदार आल्यानंतर शिंदे गटाची बैठक होईल. या बैठकीत गटनेता निवडण्यात येईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.