एयरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. आयटीआय अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Airport Authority Of India Bharti 2025

तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला आयटीआर अप्रेंटिस पदासाठी apprenticeshipindia.org या पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. तसेच ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी NATS पोर्टल nats.education.gov.in यावर जाऊन अर्ज करावेत या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. Airport Authority Of India Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करताना तुन्हाला ४ वर्षांचा फुल टाइम डिग्री किंवा ३ वर्षांचा इंजिनियरिंग डिप्लोमा प्राप्त केलेला असावा. आयटीआय अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय/ NCVT सर्टिफिकेट प्राप्त केलेला असावा.
वयोमर्यादा : एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी १८ ते २६ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया
एएआयमधील नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षा, इंटरव्ह्यू आणि कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाणार आहे.
किती पगार मिळणार?
यातील आयटीआय अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना ९००० रुपये पगार मिळणार आहे. ग्रॅज्युएट पदासाठी उमेदवारांना १५००० रुपये पगार मिळणार आहे. डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी १२००० रुपये पगार मिळणार आहे. या अप्रेंटिसशिपचा कालावधी १ वर्षाचा असणार आहे.












