जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जर तुम्हालाही आरोग्य विभागात सरकारी नोकरी मिळवायची असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नवी दिल्ली यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत विविध गट-ब आणि क पदांसाठी भरती जाहीर केली आहे. विशेष या भरतीसाठी १०वी/१२वी ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. AIIMS Recruitment 2025

या भरतीद्वारे, २३०० हून अधिक रिक्त पदे भरली जाणार आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in. ला भेट देऊन अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज फक्त ऑ AIIMS Recruitment 2025नलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे AIIMS Bharti 2025

पदाचे नाव :
ग्रुप B & C असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट,असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे
शैक्षणिक पात्रता
या भरती मोहिमेत मागितलेली शैक्षणिक पात्रता पदांनुसार बदलते.10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी उमेदवार अर्ज करू शकतात (आवश्यक पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी)
शुल्क किती असेल
या भरती परीक्षेत अर्ज भरण्यासोबतच, सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना फी म्हणून 3000 रुपये जमा करावे लागतील. एससी/एसटी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना फी म्हणून 2400 रुपये भरावे लागतील. पीडीडब्ल्यू श्रेणीतील उमेदवार या भरती परीक्षेत बसण्यासाठी फॉर्म पूर्णपणे मोफत भरू शकतात.
वयोमर्यादा
अर्जदारांची वयोमर्यादा पदानुसार साधारणपणे १८ ते ३५ वर्षे असते. एससी/एसटी (५ वर्षे), ओबीसी (३ वर्षे) आणि पीडब्ल्यूबीडी (१० वर्षे) सारख्या राखीव श्रेणींसाठी सरकारी नियमांनुसार वयात सूट उपलब्ध आहे.
अर्ज कसा करायचा
१. AIIMS CRE अर्ज भरण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in वर जा.
२. वेबसाइटच्या होम पेजवरील भरती बटणावर क्लिक करा आणि ‘कॉमन रिक्रूटमेंट एक्झामिनेशन (CRE)’ या अधिसूचनेवर क्लिक करा.
३. आता तुम्हाला Create New Account वर क्लिक करून आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करावी लागेल.
४. नोंदणीनंतर, उमेदवार इतर तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
५. शेवटी, विहित शुल्क भरा आणि पूर्णपणे भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि ती सुरक्षित ठेवा.












